लता भगवान करे यांची खरी कहाणी.! | Lata Bhagwan Kare Biograhyनमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी काल  हि संघर्ष केला आजही माझा संघर्ष सुरूच आहे आणि पुढेही माझ्या जीवन असाच संघर्ष सुरु असेल. प्रयत्नांना व्हायचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे जिंकणे चिरतरुण आहे. एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे फक्त स्वतःला ओळखण्याचा अवकाश आहे असं सांगणाऱ्या लता भगवान करे एक संघर्षगाथा १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. तर आज आपण याच लता भगवान करे यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.


relax.life
लता भगवान करे या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील माळोना गावातल्या आहेत. राहत्या गावात उत्पन्नाचे काही  साधन नसल्या कारणाने हे कुटुंब चार वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील जळोची गावात आलं. बारामती शहरातील जळोची गावात लता करे या भाडेतत्वावर राहतात. अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या लता करे यांनी जराही न डगमगता आपल्या ३ मुली आणि एक मुलासह संसाराचा गाडा हाकला. या कुटुंबाने मोलमजुरी करून ३ मुलींची आणि मुलांची लग्न केली. लता करे यांचे पती भगवान करे हृदयविकाराच्या आजाराने त्रस्थ आहेत. तर मुलाचे शिक्षण गरीब परिस्थितीमुळे अपूर्ण राहिले. अपुऱ्या शिक्षणामुळे त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही.


relax.life
बारामतीमध्ये दरवर्षी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त शरद मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणजेच लता भगवान करे नववारी साडी आणि डोक्यावर पदर आणि कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावणाऱ्या ६५ वर्षांच्या लताबाई करे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला तो आपल्या कुटुंबासाठी. २०१३ मध्ये पती भगवान करे यांच्या उपचारासाठी त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावल्या आणि प्रथम क्रमांक  देखील पटकवला. स्पर्धेच्या एक दिवस आधी आजारी असलेल्या लताबाईंना दिसत होती ती बक्षिसाची ५००० रुपयांची रक्कम. या रकमेतून पतीच्या हृदय विकाराच्या तपासण्या करता येणं त्यांना शक्य होतं.


relax.life
यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये भाग घेतला तो घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि अडीच किलोमीटर अंतर त्यांनी सहज पूर्ण केलं. केवळ एकदा तोंड नव्हे तर सलग ३ वेळा लताबाईंनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी धावून बारामतीमधील शरद मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यानंतर लता करे या केवळ राज्यातच नाही राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आल्या. माध्यमांनी दखल घेतल्यानंतर त्यांना मदतही मिळाली. आता मात्र त्या वेगळ्या कारणांनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ते म्हणजे त्यांच्या जीवनकथेवर आधारित लता भगवान करे मराठी चित्रपट १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला. एका अशिक्षित पण जिद्दी महिलेची कथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे लता करे याच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. लता करे यांचे पती भगवान व मुलगा सुनील हे दोघेही चित्रपटात झळकले आहेत.

तर मित्रांनो आम्ही आशा करतो कि हि माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. 

13 वेळा आक्रमण करूनही हा किल्ला इंग्रज जिंकू शकले नाहीत.नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका किल्ल्याची माहिती सांगणार आहोत जो इंग्रजांनी १३ वेळा आक्रमण करून सुद्धा त्यांना तो मिळवता आला नाही. असा कोणता किल्ला आहे जो १३ वेळा आक्रमण करूनही मिळवता न येऊन ते माघारी फिरले. जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.


indiamyworld.com
भारतातील सगळेच किल्ले कोणत्या न कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपूर मध्ये आहे. " Lohagad (लोहगड) " असे या किल्ल्याचे नाव आहे. कोणीही जिंकू न शकलेला असा भारतातील किल्ला असल्याचं बोललं जात. इतकंच काय तर इंग्रजांनीही इथे हार मानली होती. या किल्ल्याची निर्मिती २८५ वर्षांआधी म्हणजे १९ फेब्रुवारी १७३३ ला महाराज सुरजमल यांनी केली होती. त्या काळात बारूद आणि तोफेचा वापर अधिक होता त्यामुळे हा किल्ला तयार करताना वेगळा प्रयोग करण्यात आला होता ज्यामुळे तोफगोळे भिंतीवर पडून त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. या किल्ल्याच्या निर्मितीच्या आधी एक रुंद आणि मजबूत दगडांची भिंत तयार करण्यात आली होती जेणेकरून तोफगोळ्यांचा काहीच प्रभाव होऊ नये. त्यासाठी या भिंतीच्या चारही बाजूने शेकडो फूट कच्च्या मातीची भिंत उभारण्यात आली आणि खाली खोल खड्डा करून त्यात पाणी टाकण्यात आलं. अशात जर दुश्मन सैन्याने पाणी पार केलं तरी ते सपाट भिंतीवर चढू शकत नव्हते.
ohmyrajasthan.com
या किल्ल्यावर आक्रमण करणे कोणासाठीही सोप्प नव्हतं कारण तोफेतून निघणारे गोळे चिखलाच्या मातीत घुसायचे आणि त्यांची आग विझली जायची. त्याने किल्ल्याचं काहीच नुकसान होत नव्हतं. त्यामुळेच दुश्मन किल्ल्याच्या आत प्रवेश करू शकत नव्हते. असं म्हणतात कि हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी १३ वेळा आक्रमण केलं होत. इंग्रज सैन्याने इथे शेकडो तोफगोळे फेकले होते पण काहीच झालं नाही. १३ पैकी एकदाही किल्ल्यात ते घुसू शकले नाहीत. असं म्हणतात इंग्रज पुन्हा पुन्हा हरल्यानंतर निराश झाले आणि तिथून निघून गेले होते. इतिहासकार जेम्स स्टार्ड यांच्या म्हणण्यानुसार या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत याच्या भिंती होत्या. या भिंती मातीपासून तयार केल्या होत्या. तरीसुद्धा हा किल्ला ताब्यात घेणे म्हणजे लोखंडाचे चणे खाण्याइतकं होत.

तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती पडलंच असेल १३ वेळा आक्रमण करून इंग्रजांना जो किल्ला मिळवता आला नाही त्यांना माघारी जावं लागलं असा किल्ला म्हणजे राजस्थानच्या भरपूर मध्ये असलेला " Lohagad लोहगड " किल्ला. मित्रांनो हि माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका. 

केस न गळण्याकरिता करा हे घरगुती उपाय | How to Reduce Hairfall.?


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि केस गळण्याची समस्या जर तुम्हाला असेल तर अशा ५ गोष्टी कोणत्या करायच्या ज्याने तुमची केस गळती थांबेल. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये केसांचं पोषण आमचं राहून जाते आणि केसांचं पोषण होणं खूप गरजेचे आहे. पोषण न झाल्यास केस मोठ्या प्रमाणावर गळतात त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.

केस धुण्याआधी आपण काय करावं? कोणत्या टिप्स फायदेशीर ठरतील हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


hairbuddha.net
बदाम,ऑलिव्ह किंवा एरंडतेल या प्रकारच्या तेलांना एकत्रित करून घ्यावे. आणि ते मिश्रण केलेलं तेल केसांना लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल आणि केस गळणे थांबेल.


केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरूच नये. गरम पाणी वापरल्यामुळे तुमचे जे केस आहेत ते तुटतात. कारण गरम पाण्यामुळे केसांना इजा पोहोचतात तसेच गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे सुद्धा होतात.
अंघोळीआधी केसांना दही आणि अंड यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर म्हणून मानले जाते. तसेच केस धुण्याआधी केसांना तेल लावून २० मिनिटे मालिश करावी.

netmeds.com
काळी डाळ रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित वाटून घ्या आणि त्या मध्ये अंड , लिंबाचा रस आणि दही टाकून ती केसांना लावल्याने फायदा होतो.

तर मित्रांनो अशाप्रकारे आपले जर केस गळत असतील तर या ज्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत त्या केसांसाठी सर्वोत्कृष्ट आहेत, त्यामुळे आपले केस गळत आहेत ते नक्कीच थांबतील. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. 

Valentines Day म्हणजे नक्की काय? | जाणून घ्या Valentines Day साजरा करण्यामागचं खरं कारण.!


नमस्कार DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो Valentines Day हा असा एकमेव दिवस आहे जो संपूर्ण जगभरात एका व्यक्तीच्या मरणार्थ साजरा केला जातो. तिसऱ्या शतकातील यूरोप मधील रोम पूर्ण जगभरात शक्तिशाली साम्राज्य म्हणून मानले जात होते. रोम चा राजा होता कोल्डिअस. तो स्वभावाने निर्दयी व क्रूर होता. कोल्डिअस च्या मते लग्न न झालेला पुरुष लग्न झालेल्या पुरुषापेक्षा ताकदवान असतो. याचकारणाने कोल्डिअस ने त्याच्या राज्यत लग्न करण्यावर बंदी आणली. त्याच्या या निर्णयामुळे लोकांच्यात खूप असंतोष पसरला.
uncutmountainsupply.com
त्याच काळात रोम मध्ये एक फादरी राहत होते. त्यांचे नाव होते Saint Valentine. ते या आदेशाच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांनी राजाच्या नकळत लग्न लावायचे ठरवले. पण काही काळाने राजाला हि गोष्ट कळली, आणि राजाने त्यांना फाशी देण्याचे ठरवले.


wonderideas.club
मित्रांनो हा दिवस होता १४ फेब्रुवारी. याच दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. फाशी देण्याआधी Saint Valentine नि एक लेटर लिहिले होते. त्या लेटर च्या शेवटला त्यांनी Yours Valentines असा केला होता. मित्रांनो अशाप्रकारे Saint Valentine यांनी संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश दिला होता.

म्हणूनच  आपण आज Valentines Day च्या निगडित काही आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेणार आहोत.  • मित्रांनो दरवर्षी १४ फेब्रुवारी ला Valentines Day  हा दिवस जगभर साजरा केला जातो. फ्रान्स,कॅनडा,मेक्सिको,इटली,डेन्मार्क,ऑस्ट्रेलिया, यांसारख्या देशामध्ये Valentines Day हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. १९९२ पासून Valentines Day हा भारतात देखील साजरा होऊ लागला. 
  • मित्रांनो एकट्या अमेरिकेत १८ करोड गुलाबांची विक्री हि Valentines Day च्या दिवशी होते. 
  • इटली मध्ये अशी परंपरा आहे कि Valentines Day दिवशी दिसणारा पहिला पुरुष हा होणार जीवांसाठी आहे असे मानले जाते. 
  • संपूर्ण जगात जपान हा असा एकमेव देश आहे जिथे फक्त पुरुष Valentines Day साजरा करतात. 
  • मित्रांनो दरवर्षी १४ फेब्रुवारीला एक अरब ग्रीटिंग कार्ड  जगभरात पाठवली जातात. 
  • मित्रांनो संपूर्ण जगभरात इराण हा असा देश आहे जिथे Valentines Day हा बॅन आहे. इराण सरकारने २०११ पासून Valentines Day बॅन केला आहे. इकडे या दिवशी लाल गुलाब आणि प्रेमाची प्रत्येक गोष्ट बॅन आहे. 
  • जगातील पहिले valentine card हे १८व्या शतकात पाठवण्यात आले होते. 
  • २०१० मध्ये Valentines Day दिवशी मेक्सिको मध्ये  ३९,८९७ लोकांनी एकसाथ किस करण्याचा विश्व विक्रम केला होता. 
  • १४ फेब्रुवारी हा जरी प्रेमिकांच्या दिवस असला तरी जगभरात जास्त ग्रीटिंग कार्ड्स हि शक्षकांना दिली जातात. 
  • जर्मनी मध्ये मुली Valentines Day दिवशी कांद्याचे झाड लावतात व त्याभोवती मुलांच्या नावाच्या चिट्ठ्या पसरवतात. त्यांचा असा समज आहे कि ज्या चिट्ठीच्या शेजारी पहिले रोपटे येईल त्या व्यक्तीशी त्यांचं लग्न होईल. 


मित्रांनो या होत्या Valentines Day बद्दलच्या काही विलक्षण गोष्टी. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कराल तर आयुष्यभर रडत बसाल? | Share Market Reality


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो पैसे तर सर्वजण कमवतात. कोणी जास्त तर कोणी कमी, पण कमावलेल्या पैशांचं काय करायचं? सोशल मीडियावर या बद्दल अनेक प्रकारचे विडिओ पाहायला मिळतात. त्या मध्ये तुम्हाला सांगितलं जातं कि सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेऊ नका, Fixed Deposit करू नका, घरी पैसे ठेऊ नका,कारण Inflation Rate वाढत असतो ज्यामुळे तुमची पैशांची किंमत कमी होते. सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर महागाई वाढत असते त्यामुळे तुमच्या पैशांमध्ये वाढ झाली नाही तर तुम्ही महागाईचा सामना करू शकणार नाही, आणि हा सामना करण्यासाठी सर्वात आधी महत्वाचा मार्ग सांगितला जातो तो म्हणजे Share Market . एका XYZ व्यक्तीने २० वर्षांपूर्वी एक हजार रुपये गुंतवले होते त्याचे आज एक लाख रुपये झाले. एका व्यक्तीने १५ ते २० हजार रुपये गुंतवले होते त्याचे आज करोडो रुपये झाले. यासाठी तुम्ही सुद्धा Share Market मध्ये गुंतवणूक करा.


businesstoday.in
जरी हे सर्वकाही खरं असलं तरी हे अर्ध सत्य आहे. या माध्यमातून करोडो सर्वसामान्य लोकांना फसवण्याचे काम होत आहे. कारण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे सोप्पे आहे परंतु त्यामधून रिटर्न्स मिळवणे खूप कठीण. तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करायला हवी. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओंमध्ये विश्वास ठेऊन कोणताही विचार न करता डायरेक्ट Demat Account ओपन करतात, आणि जेवढे सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे आहेत त्याची गुंतवणूक करायला सुरवात करतात.
blog.runnymede.com
प्रथम गुंतवणूक १०००, २००० पासून चालू करा नंतर चांगल्या रिटर्न्स नंतर माहिती मिळत जाईल. परंतु बरेच लोक २००० बुडाले असता ४००० गुंतणूक करतात, नंतर त्यांना समजत कि आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली. त्यानंतर पुन्हा १०,००० अशी रक्कम वाढत जाते. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान होते. मग या लोकांसाठी शेअर मार्केट म्हणजे एक जुगारच बनतो. आज या कंपनीवर पैसे लावले म्हणून थोडा फायदा झाला, उद्या त्या कंपनीवर लावू आणि तिकडे लावल्यानंतर सर्वच बुडतात. फायदा कमीवेळा आणि तोटा जास्त वेळा होतो. आणि नंतर हेच लोक शेअर मार्केट ला जुगारच नाव देतात. जर तुम्हाला माहिती नसेल बिसिनेस कसा चालतो, बॅलन्स शीट काय असते, कोणता बिसिनेस कधी मोठा होणार, कोणता बिसिनेस कधी फेल होणार, कोणती कंपनी फ्रॉड आहे आणि कोणती खरी, त्यांची बिसिनेस स्ट्रॅटजी कशी असायला हवी, त्यांचं फ्युचर काय असेल यांची सर्व माहिती असायला हवी. जेव्हा हि सर्व माहिती मिळते तेव्हा कळतं कि शेअर मार्केट एक जुगार नाही तर एक विचारपूर्वक गुंतवणूक करण्याच साधन आहे.

शेवटी आम्ही एवढंच सांगु कि सुरुवात खूप कमी पैशाने करा. जेवढं नॉलेज आहे त्याच्या १० टक्के फक्त गुंतवणूक करा. जेव्हा तुम्हाला समजेल रिटर्न्स चांगले येत आहेत मगच त्यामध्ये हळूहळू वाढ करायला सुरुवात करा. जर कोणी सांगत असेल करोडो रुपये या मध्ये कमवून देतो, तुला मी टिप्स देतो  तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या जगात कोणी कोणासाठी फुकट काम करत नाही. त्यामध्ये त्या फंड मॅनेजर चा स्वार्थ असतो, त्याला ते फंड सेल करायचे असतात, त्याचे टार्गेट पूर्ण करायचे असते. म्हणूनच शेअर मार्केटमधील दलालांपासून दूर राहा.
moneycontrol.com
त्यासोबत सध्या एक नवीन ट्रेंड सुरु आहे तो म्हणजे मला जॉब करायचा नाही, मला व्यवसाय करायचा नाही, मला मस्त लाईफ जगायची आहे, त्यामुळे मी घरी बसून स्टॉक मार्केट मध्ये काम करणार, शेअर ची खरेदी विक्री करून करोडो रुपये कमवणार, असं स्वप्न बघून करोडो लोक आपलं करियर बरबाद करत आहेत. कारण त्यांना शेअर मार्केट मधील झिरो नॉलेज असतं. तरी सुद्धा सुरु असलेला कमाईचा मार्ग बंद करून ते घरी बसतात आणि जी रक्कम त्यांनी कमावली होती ती सगळी शेअर मार्केट मध्ये गमवून बसतात. म्हणून शेअर मार्केट मध्ये उतरताना १०० वेळा विचार करून उतरा. जो पर्यन्त तुम्ही कमवू शकता हा विश्वास तयार होत नाही आणि तसे रिजल्ट दिसत नाहीत तो पर्यंत शेअर मार्केट मध्ये मोठी गुंतवणूक करू नका.

तुम्हाला शेअर मार्केट बद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. 

मुळव्याधाचा आजार 10 मिनीटात दूर करा | खर्च फक्त 1 रुपये | Home Remedy For Piles


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला अनेक आजार पाहायला मिळतात. काही आजार आपण समाजामध्ये सांगू शकतो तर काही सांगू शकत नाही. काही असे आजार असतात जे लपवले जातात. त्यापैकी एक असा आजार आहे जो ७० ते ८० टक्के लोकांना असतो पण ते सांगायला घाबरतात किंवा त्यांना ते विचित्र वाटत. या आजाराचं नाव आहे Piles किंवा आपण त्याला मूळव्याध म्हणतो. हा आजार असल्यास बरेच लोक सांगायला घाबरतात किंवा समाजामध्ये त्यांना लाज वाटते. त्यामुळे याची चर्चा स्पष्टपणे कोणीच करत नाही. सर्वजण हा आजार लपवण्याचा प्रयत्न करतात. पण याने हा आजार बळावला जातो आणि एवढ्या टोकाला जातो कि जगणंही मुश्किल बनतं. खुपसारे साईड इफेक्ट त्यांना पाहायला मिळतील. अक्षरशः तुम्हाला उठता किंवा बसताही येणार नाही. सतत रक्तप्रवाह त्यातून होत राहील. त्यामुळे याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी एक शुद्ध देशी उपाय आहे ज्यासाठी तुम्हाला फक्त १ रुपया खर्च करावे लागणार आहे. तर आज आपण मुळव्याधाचा आजार कशा पद्धतीने १ रुपयांमध्ये घालवू शकतो हे जाणून घेणार आहोत.
मुळव्याधाची सुरवात फक्त रक्तस्त्रावाने होते.  जास्त तेलकट,तिखट, किंवा यावेळी जेवण केल्याने हा आजार होऊ शकतो. त्यासाठी वेळीस आळा घालणे गरजेचे आहे. सुरवातीला रक्तस्त्राव होतो त्यानंतर हळूहळू Piles बनायला सुरवात होतात. एका कोंबाप्रमाणे हे दिसू लागते. तुमचा रक्तप्रवाह एका चमड्यातून खाली उतरत जातो. एक मांसल गोळा तुमच्या गुदद्वाराजवळ जमला जातो ज्यामुळे हळू हळू त्रास होऊ लागतो. व उठताना बसताना त्याची जाणीव होऊ लागते. हा आजार  पुढे जाऊन एवढा बळावतो कि जगणे मुश्किल होते. उठताना बसताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येऊ लागत. त्यामुळे यापासून आळा घालण्यासाठी आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत जे तुम्ही व्यवस्थितरीत्या करा ज्याने तुमचा आजार काही दिवसातच बरा होईल. 
हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला एक लिंबू आणि सेंधव मीठ लागेल. लिंबूला मधोमध  चिरून घ्या आणि त्याच्यावरती थोडंसं सेंधव मीठ घाला. हे सेंधव मीठ घातल्यानंतर तो लिंबू तोंडामध्ये घ्या व ज्याप्रमाणे एखाद चॉकलेट खातो किंवा कोणताही पदार्थ चोखतो त्याप्रमाणे त्याला चोखावं लागेल किंवा थोडंसं तोंडामध्ये पिळलं तरी चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवा हि क्रिया खूप गडबडीने करू नये. एकदम सावकाश हि क्रिया तुम्हाला करावी लागेल. लिंबू तोंडातून बाहेर काढून त्यावर आणखी सेंधव मीठ घालून तुम्हाला तो चॊखवा लागेल. असे २ ते ३ वेळा करावे. हि क्रिया केल्यांनतर १० मिनिटाच्या आत तुमच्या गुदद्वाराजवळ होणारी आग थांबेल. मुळव्याधाचा त्रास १० मिनिटातच थांबेल. हि क्रिया १ आठवडा सकाळ - संध्याकाळ केल्यास तुम्हाला कधीच मुळव्याधाचा त्रास होणार नाही. 

यामध्ये एक काळजी घ्या. लिंबाचा रस वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये मीठ टाकू नये. ज्याप्रमाने क्रिया सांगितली आहे तशीच करावी. तसेच लिंबुवर लावण्यासाठी सेंधव मीठ च घ्यावे दुसरा कोणतही मीठ वापरू नये. त्याने तुम्हाला कोणताही फरक पडणार नाही. 

आम्ही आशा करतो तुम्हाला याचा नक्कीच फरक पडेल. आणि हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. 

मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी नेमकं काय करावं.? | How to Port Mobile Number?


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या TRAI ने Mobile Number Portability साठीचे नियम सोपे केले आहेत. म्हणजेच आता फक्त ३ दिवसातच एका सर्व्हिस प्रोव्हायडर कडून तुमचा नंबर दुसऱ्या कंपनीकडे आरामात नेता येईल. नेमकं काय करावे लागेल हे जाणून घ्यायचे असेल तर हि माहिती पूर्ण वाचा.

Mobile Number Portability किंवा MNP म्हणजे तुमच्याकडे सध्या असणारा मोबाईल नंबर न बदलता एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे नेता येणं. पूर्वी या प्रोसेस साठी जरा जास्त कालावधी लागायचा पण आता मात्र TRAI ने यासाठीचे नियम बदललेत, सोप्पे केलेत आणि म्हणूनच हि प्रोसेस ३ ते ५ दिवसामध्ये पार पडणार आहे. त्यासाठी नेमकं काय तुम्हाला करायला लागणार आहे?

themobileindian.com

सगळ्यात आधी यासाठी तुम्हाला जनरेट करावं लागेल एक Uniq Porting Code म्हणजेच असा कोड ज्याची मदत तुम्हाला पुढचे व्यवहार करायला होणार आहे. पण हा कोड जनरेट करण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. म्हणजे जर तुमच्याकडे पोस्टपेड कनेक्शन असेल तर तुमच्या बिलिंग सायकल नुसार तुमचं जर का काही बिल राहिलेलं असेल तर ते आधी तुम्हाला भरायला लागेल. याशिवाय तुम्ही आता ज्या कंपनीची सेवा वापरताय त्या कंपनीचे किमान ९० दिवस तुम्ही ग्राहक असणे गरजेचे आहे. आणि शिवाय तुम्हाला जो नंबर हवाय त्या नंबर वर दुसऱ्या कोणी दावा केलेला नाहीय ना किंवा त्या विषयी काही वाद नाहीयत ना या गोष्टी देखील लक्षात घ्याव्या लागतील. या गोष्टींची जर पूर्तता होत असेल तर तुम्ही Uniq Porting Code जनरेट करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला त्याच नंबर वरून एक मेसेज पाठवायचंय. मेसेज पाठवण्यासाठी खाली दिलेल्या माहिती प्रमाणे टाईप करा;

PORT   Mobile Number 
आणि हा मेसेज १९०० या नंबर वर पाठवा. 
indiatoday.in

त्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल वर एक Uniq Porting Code येईल. पुढचे ४ दिवस हा कोड वैध्य असेल. म्हणजे या ४ दिवसात तुम्हाला सगळं कामकाज पूर्ण करायचंय. फक्त जम्मू काश्मीर,आसाम आणि ईशान्यकडच्या राज्यांमध्ये हा Uniq Porting Code पुढचा महिनाभर वैध्य असणार आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय कि ज्या कंपनीची सेवा तुम्हाला घायची आहे त्यांच्या गॅलरीत जा आणि त्यांच्याकडे काही फॉर्म्स भरावे लागतील शिवाय तुम्हाला तुमचं KYC पूर्ण करावं लागेल. आणि यामध्ये हा कोड तुम्हाला नमूद करावा लागेल. हे पूर्ण केल्यावर साधारण ३ ते ५ दिवसात तुमचा मोबाईल नंबर एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे PORT होईल. जर तुम्ही ज्या शहरात आहात त्यामध्येच एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे जात असाल तर ३ दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल. आणि समजा तुम्ही शहर बदलत असाल म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असाल तर ५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण व्हायला हवं.


mangaloretoday.com

अर्थातच हा नंबर Port करण्यासाठी तुम्हाला मोबाईल कंपनीला तुमचा ID Proof आणि तुमचं Residencial Proof द्यावं लागेल. हि सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचं नवीन सिमकार्ड मिळेल आणि ते काही काळातच ऍक्टिव्हेट होईल. हे सगळं झालं वयक्तिक नंबर साठी. पण कॉर्पोरेट नंबर साठीच्या कोणत्याही नियमांमध्ये TRAI ने बदल केलेला नाहीय.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि Mobile Number Portability बद्दल हि संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तसेच आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला नक्कीच विसरू नका.