Search Bar

इंदुरीकर महाराजांची दुसरी बाजू बघून तुम्हालाही बसेल धक्का..!


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इंदुरीकर महाराजांनी एक क्रांती घडवून आणली आहे. कीर्तन आणि अध्यात्म हे पुन्हा एकदा गावागावात पोहोचवलं आणि हि कला जिवंत राहिली ती फक्त इंदुरीकर महाराजांमुळे असं म्हणायला हरकत नाही. महाराज प्रबोधन करतात ती एक वेगळी स्टायल आहे जी हल्ली काही लोकांना जास्तच बोचायला लागलेय असं दिसतंय. आज आपण जाणून घेऊया महाराजांबद्दल काही खास गोष्टी ज्या आपल्याला कदाचित माहीतही नसतील.


आपल्या निवृत्ती महाराज यांचे पूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. ते ओझर खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे राहतात. तर ते मूळचे रहिवाशी इंदुरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील आहेत. अनाथांचा नाथ इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्याच लोकांना माहित असेल. महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर येथे जे विद्यार्थी आहेत त्यात ८५ पेक्षा जास्त विद्यार्थिनी व अनेक अनाथ निराधार मुलं आहेत. शाळामागील अनेक वर्षांपासून इंदुरीकर महाराज स्वखर्चाने चालवतात. निवृत्ती महाराज स्वतः बी एस इ बीएड आहेत आणि याच शाळेत त्यांनी शिक्षकाची जबाबदारी देखील पार पाडलेली आहे. शाळेत डिजिटल क्लास रूम सुद्धा आहेत. संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द पंचक्रोशीत बंद पडलेले हरिभक्त पराणायचे सप्तहित  महाराज स्वखर्चाने करतात. तसेच पंचक्रोशीतील मंदिराचे रंगकाम मंदिरातील मूर्ती महाराज स्वखर्चाने देतात.
thehindu
इंदुरीकर महाराजांची ओळख विनोदी कीर्तनकार म्हणून केली तर ती चुकीची ठरेल. अर्थात ते अस्थित्वाची जाणीव सत्य स्वरूपातील दाखले देत व प्रत्यक्ष स्वरूपाचे प्रमाण देत मांडतात म्हणून ते विनोदी निर्मिती करतात व विनोद निर्माण होतो. गाडगेबाबा,तुकडोजी महाराज यांच्या समाज प्रबोधन पद्धतीच्या शैलीचा वापर त्यांच्या प्रवरचनात दिसतो. रोकठोकपना अस्थित्वाला पडदा न ठेवण्याची शैली हीच इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची खरी ओळख. आणि आज महाराष्ट्रातील एक नंबरचे कीर्तनकार तथा समाजप्रभोदनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी हे महाराजांचं मूळ गाव. आणि या गावच्या नावावरूनच महाराज इंदुरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सत्यकालिन समाजातील कुप्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात. काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलांमुळे इतर कीर्तनकारांपेक्षा इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रमाण प्रचंड असते आणि हेच त्याचे मूळ कारण.

तमाशा बघणारा समाज कीर्तन बघू लागला आणि विदेशी संस्कृतीचं वेड लागणारी तरुणाई मराठी संस्कृतीसमोर नतमस्तक होऊ लागली हि इंदुरीकर महाराज यांच्यामुळेच. We Support Indurikar.

तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. 

Post a Comment

Previous Post Next Post